belgaum

निवृत्त सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचे स्वप्न होणार पूर्ण

0
Roshan mohammad dc
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी ‘गृहभाग्य योजना’ राबवण्यात येत असून, सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना स्वतःचा भूखंड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले की, शहराच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे कल्याण साधणे हे प्रशासनाचे मुख्य कर्तव्य आहे.

कार्यरत कर्मचाऱ्यांच्या गृहसौख्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून, ज्या सफाई कर्मचाऱ्यांची सेवा पूर्ण झाली आहे किंवा जे निवृत्त झाले आहेत, त्यांना निवासासाठी भूखंड देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

 belgaum

यासाठी जिल्ह्यातील विविध नगरपालिका आणि महापालिका हद्दीत योग्य जमिनींची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

जागा निश्चिती आणि पाहणीची प्रक्रिया पूर्ण होताच पात्र निवृत्त कर्मचाऱ्यांना मंजुरी देऊन भूखंड हस्तांतरणाची कायदेशीर प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी नमूद केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.