belgaum

पाऊस पडताच येडियुरप्पा रोडवर पुन्हा पाणी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : परतीच्या पावसाने आज पुन्हा एकदा येडियुरप्पा रोडवरील विकासकामांचे वाभाडे काढले. पावसाच्या जोरदार सरी सुरू होताच नेहमीप्रमाणे रस्त्यावर सांडपाणी साचले आणि काही वेळातच मार्गावरून वाहतूक करताना वाहनधारकांना कसरत करावी लागली. विकासकामांवर मोठा खर्च होत असताना पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य नियोजन का केले जात नाही, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शहराच्या विविध भागांना जोडणाऱ्या या रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली की त्याचा परिणाम वाहनधारक आणि पादचाऱ्यांवर होतो.

आजच्या पावसानेही हीच परिस्थिती पुन्हा अनुभवास आली. पावसाचा जोर वाढताच रस्त्यावर सांडपाणी साचल्याने रस्त्याचा काही भाग जलमय झाला. पाण्याखाली रस्त्यावरील खड्डे आणि असमतोल भाग दिसेनासे झाल्याने दुचाकीस्वारांना विशेष काळजीपूर्वक वाहने चालवावी लागत होती. पाण्यातून मार्ग काढताना वाहनांचा वेग मंदावल्याने काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला.

 belgaum

विशेष म्हणजे, येडियुरप्पा रोडवरील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत यापूर्वीही नागरिकांनी आवाज उठवला आहे. या मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी करत विविध गावांतील नागरिक, कामगार आणि शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. पावसामुळे रस्त्याची अवस्था अधिक खराब झाल्याचे त्यावेळीही निदर्शनास आणून देण्यात आले होते.

मात्र याकडे अद्याप लक्ष पुरविण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे. बेळगाव शहरातील विविध रस्त्यांवर विकासकामे, पाणीपुरवठा योजनेची कामे आणि खोदकामानंतरच्या पुनर्बांधणीचा प्रश्न यापूर्वीही चर्चेत आला आहे. काही ठिकाणी नव्याने तयार केलेले रस्ते पुन्हा खोदले गेल्याने आणि पुनर्बांधणीला विलंब झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

येडियुरप्पा रोडवर दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या निर्माण होत असेल, तर केवळ पावसाचे पाणी हटविण्याची तात्पुरती उपाययोजना करण्यापेक्षा त्यामागील कारण शोधण्याची गरज आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी निचरा व्यवस्था सक्षम आहे का, सांडपाण्याचा प्रवाह योग्य दिशेने आहे का आणि रस्त्याची उंची-उताराची रचना योग्य आहे का, याची पाहणी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.