belgaum

गांजा विक्रीप्रकरणी तिघांना अटक

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : शहरात गांजा विक्री करणाऱ्या तिघांना सीसीबी पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून १ किलो १०० ग्रॅम गांजा, मोबाईल आणि दुचाकीसह एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ सप्टेंबर २०२६ रोजी अक्षयकुमार सोमशेखर अंकलगी (२०, रा. गुरुवार पेठ, कित्तूर), आदर्श ईरय्या हिरेमठ (२५, रा. सोमवार पेठ, कित्तूर) आणि मणिकंठ राचय्या उगरखोड (२०, रा. गुरुवार पेठ, कित्तूर) हे तिघे आरोपी गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

सागर किनारा ढाबा, यडियुरप्पा मार्ग परिसरात आरोपी दुचाकीवर गांजा ठेवून सार्वजनिक ठिकाणी विक्री करत असताना सीसीबी पोलिसांनी छापा टाकला. सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय मंजुनाथ भजंत्री आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

 belgaum

या कारवाईत ५५ हजार रुपये किमतीचा १ किलो १०० ग्रॅम गांजा, ५ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल आणि १ लाख २० हजार रुपये किमतीची हिरो एक्स्ट्रीम दुचाकी असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२४/२०२६, एनडीपीएस कायद्याच्या कलम २०(b)(ii)(B) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी ‘मैताब’ नावाच्या व्यक्तीकडून गांजा आणल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

कच्ची दारू विक्रीप्रकरणी एकाला अटक

दरम्यान, बेळगाव ग्रामीण पोलिसांनी मच्चे गावच्या हद्दीत कच्ची दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली. परशुराम बसाप्पा नाईक (३५, रा. वाल्मीकी नगर, बेळगाव) हा सार्वजनिक ठिकाणी कच्ची दारू विक्री करण्याच्या उद्देशाने उभा असताना पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली.

बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पीएसआय विनोदकुमार सरनाईक आणि कर्मचाऱ्यांनी छापा टाकून आरोपीकडून २० लिटर कच्ची दारू जप्त केली. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०६/२०२६, कर्नाटक उत्पादन शुल्क कायदा १९६५ मधील कलम ३२ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.

दोन्ही कारवायांमध्ये सहभागी सीसीबीचे पोलीस निरीक्षक, पीएसआय आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे पोलीस आयुक्त तसेच डीसीपी यांनी कौतुक केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.