बेळगाव लाईव्ह : शालेय शिक्षण विभागाच्या वतीने २०२६ सालासाठी देण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी बेळगाव जिल्ह्यातील ५० शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतील प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांचा या यादीत समावेश आहे.
बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल, बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण, खानापूर, सौंदत्ती, रामदुर्ग आणि कित्तूर तालुक्यांतील शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मराठी, कन्नड आणि उर्दू माध्यमातील शिक्षकांसह विविध शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांचा यामध्ये समावेश आहे.
पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांमध्ये बैलहोंगल तालुक्यातील बसवण्णेप्प उडकेरी, रुद्रप्प के. तरगार, सुमन श्रीशैल कट्टी, बेळगाव तालुक्यातील शाहीन परवीन बाबू जमादार, सुरेखा नवलगुंदे, मोनिका गोंसालवीस, खानापूर तालुक्यातील अमृतुल्ला म. उस्ताद, नजीरहद पटाईत, कळ्ळप्प गौरक्कनवर, शिवपुत्र कळ्ळप्प सुनगार आदी शिक्षकांचा समावेश आहे.
तसेच सौंदत्ती तालुक्यातील प्रकाश तंगोजी, सी. एस. सिद्धसमुद्र, रत्ना पवार, सुजाता शेखप्पा जंगण्णवर, सुरेश बसनगौडा पाटील, रामदुर्ग तालुक्यातील दयाणंद हुड्डार, रमेश होसकोटी, अनिल अनंत पाटील, एम. एन. गदन्नवर, गणपती मोटे यांचीही निवड करण्यात आली आहे.
कित्तूर तालुक्यातील मंजुनाथ देमप्पा करिसिद्धनवर, पौल रुद्रप्पा हंचिनमणी, बसप्पा रामप्पा चलवादी, तर बेळगाव ग्रामीणमधील मालूताई बसलिंगगोळ, आर. व्ही. कांबळे, लक्ष्मण तरवाळ, शोभा निलजकर, गिरीश जगजंपी यांचा पुरस्कारासाठी समावेश आहे.
याशिवाय बेळगाव शहरातील नजीरहद पटाईत, राजेंद्र भंडारी, शमीमाबानू मुल्ला, मोहम्मद किल्लेदार यांच्यासह अन्य शिक्षकांचीही जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
विशेष म्हणजे येळळूर येथील के.पी.एस. मराठी मॉडेल स्कूलच्या शिक्षिका शोभा निलजकर यांचीही या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. निवड झालेल्या शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गौरव करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील शिक्षकांच्या या निवडीबद्दल शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन व्यक्त होत आहे.





