belgaum

मूळ मालक असल्याचा बनाव रचून जागा लाटण्याचा प्रयत्न

0
Sub registrar
Sub registrar belgaum
 belgaum

बेळगाव लाईव्ह : जागेची मूळ मालक असल्याचे भासवून बनावट कागदपत्रांच्या आधारे दुसऱ्याची मालमत्ता लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका ८० वर्षीय वृद्ध महिलेला मार्केट पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे.

मंदाकिनी सदाशिव परिशवाडकर (वय ८०, रा. सध्या गणेश कॉलनी, वडगाव, बेळगाव; मूळ रा. मुजावर गल्ली, बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या महिला आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रत्ना यशवंत मबरूकर (रा. माळमारुती एक्स्टेंशन, कणबर्गी रोड, बेळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तक्रारदार यांच्या नावावर कणबर्गी रोडवरील महांतेश नगर येथे ४० गुणिले ५० फूट आकाराचा भूखंड आहे. आरोपी मंदाकिनी परिशवाडकर हिने उपनिबंधक कार्यालयात (Sub-Registrar Office) स्वतःला या जागेची मूळ मालक असल्याचे भासवत कॅमेऱ्यासमोर फोटो काढले आणि अंगठ्याचे ठसे देऊन फसवणुकीने जागेचा व्यवहार करण्याचा प्रयत्न केला. तपासादरम्यान हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

 belgaum

या गुन्ह्यात तिला साथ देणारा मुख्य आरोपी राहुल अनिल मगरूम (रा. सिद्धेश्वर नगर, काकती, बेळगाव) हा आधीच मार्केट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांमध्ये फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी आरोपी मंदाकिनी परिशवाडकर हिला ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली आहे.

मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे.एम. कालीमिर्ची आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली असून, पोलीस आयुक्त आणि पोलीस उपआयुक्तांनी (DCP) या पोलीस पथकाचे अभिनंदन केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.