belgaum

बेनकनहळ्ळीत बनावट कागदपत्रांद्वारे जमीन बळकावल्याचा आरोप लोकायुक्तांकडे दाद

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळी येथील सर्व्हे नंबर १०३ मधील ४.३६ एकर जमिनीबाबत बनावट कागदपत्रे तयार करून ती हडपल्याचा संशय व्यक्त करत याप्रकरणी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती महेश देसूरकर यांनी दिली.

मंगळवारी बेळगाव येथील कन्नड साहित्य भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळवून द्यावा, अन्यथा आपल्याला दयामरण घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली.

ही जमीन आपले आजोबा आणि मूळ मालक यल्लाप्पा कल्लाप्पा देसूरकर यांच्या नावावर होती, असे महेश देसूरकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या जमिनीचे हक्क हस्तांतरित करण्यासाठी रियाज दस्तगीरसाब चौगुला, गुंडू सिद्राया मोटेकर उर्फ परीट आणि इतरांनी मिळून १४ एप्रिल १९८८ रोजी बनावट जीपीए (GPA) तयार केल्याचा आरोप त्यांनी केला.

 belgaum

या जमिनीसंदर्भातील जुनी कागदपत्रे तहसीलदार, महसूल विभाग, महसूल निरीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करून वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याबद्दल त्यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला.

विक्रीखताच्या मूल्यांमध्ये तफावत आढळून आल्याचेही देसूरकर यांनी सांगितले. १३ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या खरेदीखतात जमिनीचे मूल्य ४० लाख रुपये दाखवण्यात आले होते,

तर २८ ऑक्टोबर २०२० च्या दुसऱ्या खरेदीखतात केवळ २० लाख रुपयांचा व्यवहार दर्शवण्यात आला आहे. एकाच जमिनीसाठी वेगवेगळ्या मूल्यांची खरेदीखते कशी तयार झाली आणि त्याच्या आधारे महसूल नोंदींमध्ये फेरफार कसा झाला, याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.