belgaum

वडगावमधील गणेश विसर्जन तलावाची महामंडळाकडून पाहणी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वडगाव मेन रोडवरील चावडी गल्ली कॉर्नर, नाझर कॅम्प परिसरातील बेळगाव महानगरपालिकेच्या मालकीच्या श्री गणेशमूर्ती विसर्जन तलावाची मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेश उत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पाहणी केली. विसर्जन तलावाची सद्यस्थिती अत्यंत दयनीय असल्याने गणेशोत्सवापूर्वी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

मंगळवारी (११ ऑगस्ट) दुपारी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी तलावाची स्वच्छता, परिसरातील सुविधा, भाविकांची सुरक्षितता तसेच गणेशमूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.

गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने भाविक आणि गणेशमूर्ती विसर्जनासाठी या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विसर्जन तलावाची तातडीने स्वच्छता व दुरुस्ती करून परिसरात आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

 belgaum

विसर्जनाच्या वेळी वाहतूक कोंडी होऊ नये, भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये तसेच गणेशमूर्तींचे विसर्जन सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडावे, यासाठी संबंधित प्रशासनाने वेळेत आवश्यक तयारी करावी, यावरही यावेळी चर्चा झाली.

यावेळी रमाकांत कोंडुसकर, विकास कलघटगी, मनोहर हळगेकर, ज्ञानेश्वर मन्नूरकर, अमोल देसाई, संजय शिंदे, राजेंद्र बिर्जे, सागर पाटील, महादेव पाटील, शिवराज पाटील, सुनील बोकडे, राजेंद्र बैलूर, भरत नाग्रोळी, उदय पाटील आणि गुणवंत पाटील यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.