belgaum

सवदी, लाड होणार मंत्री, बेळगाव मधून केवळ सवदीच!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : राज्य मंत्रिमंडळ विस्तारात माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. काँग्रेस हायकमांडने जाहीर केलेल्या अंतिम मंत्रिमंडळ यादीत बेळगाव जिल्ह्यातून एकमेव मंत्री म्हणून लक्ष्मण सवदी यांचा समावेश करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून बेळगाव जिल्ह्यातून एकापेक्षा अधिक आमदारांना मंत्रिपद मिळणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू होती. मात्र, अखेर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने लक्ष्मण सवदी यांच्यावर विश्वास दाखवत त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान दिले.

दरम्यान, धारवाड जिल्ह्यातील माजी मंत्री संतोष लाड यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. मराठा समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून त्यांचीही मंत्रिपदी निवड करण्यात आल्याचे सांगितले जात असून, ते देखील आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

 belgaum

लक्ष्मण सवदी यांच्या निवडीमुळे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, राजकीय वर्तुळात त्यांच्या पुनरागमनाची चर्चा रंगली आहे. अनेकांनी त्यांना “लकी लक्ष्मण सवदी” अशी उपमा दिली आहे.

बेळगाव जिल्ह्याचे राज्य मंत्रिमंडळात एकमेव प्रतिनिधित्व करणारे मंत्री म्हणून सवदी यांच्याकडे आता जिल्ह्यातील विविध विकासकामे आणि प्रलंबित प्रश्नांबाबत मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे.

कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तार; शपथ घेणाऱ्या 20 मंत्र्यांची यादी ‘बेळगाव लाईव्ह’कडे

बेळगाव : कर्नाटक राज्य मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या 20 जणांची यादी ‘बेळगाव लाईव्ह’कडे उपलब्ध झाली आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे (AICC) सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना पाठविलेल्या पत्रानुसार काँग्रेस अध्यक्षांनी नव्या मंत्र्यांच्या समावेशास मंजुरी दिली आहे.

मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या नेत्यांची यादी पुढीलप्रमाणे :

  1. पी. एम. नरेंद्रस्वामी
  2. शिवराज तंगडगी
  3. रुद्रप्पा लामाणी
  4. के. एस. बसवंतप्पा
  5. बी. नागेंद्र
  6. टी. रघुमूर्ती
  7. बी. झेड. झमीर अहमद खान
  8. रिझवान अर्शद
  9. संतोष लाड
  10. मधू बंगारप्पा
  11. पुट्टरंगशेट्टी
  12. एस एस मल्लिकार्जुन
  13. डॉ. अजय सिंह
  14. एन. चलुवराय स्वामी
  15. के. एम. शिवलिंगे गौडा
  16. एच. सी. बालकृष्ण
  17. गायत्री शांतिगौडा
  18. बसवराज रायरेड्डी
  19. विजयानंद काशप्पनावर
  20. लक्ष्मण सवदी

याशिवाय, कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विधान परिषदेचे सभापती आणि उपसभापती पदांसाठीही काँग्रेस अध्यक्षांनी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार जी. एस. पाटील, ए. एस. पोन्नन्ना, सलीम अहमद आणि उमाश्री यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.

या मंत्रिमंडळ विस्तारात बेळगाव जिल्ह्यातून माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना संधी मिळाली असून, धारवाड जिल्ह्यातील माजी मंत्री संतोष लाड यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. दोन्ही नेते आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.