बेळगाव लाईव्ह: यरगट्टी तालुक्यातील कोडलिवाड, मुगळीहाळ तसेच गोकाक तालुक्यातील कौजळगी परिसरातील घटप्रभा उजव्या मुख्य कालव्याची आज प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
कालव्याच्या विविध ठिकाणी झालेल्या नुकसानीमुळे पाण्याचा प्रवाह अडथळला असून कालव्यालगतच्या गावांतील नागरिक आणि जनावरांना पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारींची दखल घेत ही पाहणी करण्यात आली.
पाहणीदरम्यान कालव्याच्या खराब झालेल्या भागांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले.

पाण्याचा प्रवाह सुरळीत करून गावांमध्ये तसेच जनावरांसाठी आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल, यासाठी त्वरित उपाययोजना करण्यास सांगण्यात आले.
यावेळी अक्कीसागर गावाला भेट देऊन स्थानिक नागरिकांच्या अडचणी व तक्रारीही ऐकून घेण्यात आल्या. नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.





