belgaum

अखेर बिबट्या जेरबंद; वन विभागाच्या सापळ्यात अडकला,

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील वंटमुरी घाटाच्या पाठीमागील सुतकटी (सुतगट्टी) गावाच्या वनक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून वावरत असलेला बिबट्या अखेर वन विभागाच्या सापळ्यात अडकला आहे. बुधवारी सकाळी हा बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यानंतर वन विभागाने त्याला सुरक्षित ताब्यात घेतले.

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुतकटी व शिवापूर परिसरात बिबट्याचा वावर दिसून येत होता. काही ग्रामस्थ आणि वाहनचालकांना तो अनेकदा दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ग्रामस्थांनी काकती वन विभागाला याची माहिती दिली.

त्यानंतर वन विभागाने परिसरात गस्त वाढवत बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले. काही दिवसांपूर्वी सुतकटीच्या वनक्षेत्रात पिंजरा लावण्यात आला होता. अखेर बुधवारी सकाळी बिबट्या त्या पिंजऱ्यात अडकला आणि वन विभागाच्या प्रयत्नांना यश आले.

 belgaum

यानंतर बिबट्याला काकती येथील वन्यजीव बचाव केंद्रात आणण्यात आले असून आवश्यक तपासणीनंतर त्याला भीमगड अभयारण्यात सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली.

ही कारवाई काकतीचे आरएफओ बी. एल. सनदी, हुक्केरीचे आरएफओ शिवकुमार माळी, डीआरएफओ बसवराज हनगंडी, प्रभू तंगडी, राकेश मुरारी, मुतगेकर तसेच काकती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली. यावेळी सुतकटी गावातील ग्रामस्थांनीही वन विभागाला सहकार्य केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.