belgaum

गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक

0
Camp police
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील वेंगुर्ला रोडवरील गांधी सर्कलजवळ बेकायदेशीरपणे गांजा विक्री करणाऱ्या दोन आरोपींना कॅम्प पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीपणे अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गांजा, रोख रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आले असून, गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी बेळगावच्या वेंगुर्ला रोडवरील गांधी सर्कलजवळ बेकायदेशीर गांजा विक्री करत असताना गणेशपूरच्या लक्ष्मी नगर येथील रहिवासी कौशिक कृष्ण मुदलियार (वय २२) आणि गणेशपूरच्या ज्योती नगर येथील रहिवासी चंद्रकांत अनिल थापा (वय १९) या दोन आरोपींना कॅम्प पोलीस ठाण्याचे पीएसआय आर. आय. सनदी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी धाड टाकून अटक केली. आरोपी हे गँगवाडी येथील रहिवासी मंजुनाथ याच्याकडून गांजा आणून तो स्वतःच्या फायद्यासाठी नागरिकांना विकत असल्याचे उघडकीस आले आहे.

पोलीस पथकाने आरोपींकडून १३,००० रुपये किमतीचा २ किलो ६० ग्रॅम गांजा, १,७३० रुपये रोख रक्कम आणि १०,००० रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण २४,७३० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

 belgaum

ही यशस्वी कारवाई करणाऱ्या सीसीबी विभागाचे पीआय, पीएसआय आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त व डीसीपी यांनी विशेष कौतुक केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.