belgaum

डॉ. देसाईज् किडनीस्टोन क्लिनिक’चा विस्तार मणिपूर मध्ये शाखा

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : किडनीचे आजार आणि मुतखड्याच्या (किडनी स्टोन) असह्य त्रासाने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या बेळगावमधील प्रसिद्ध ‘डॉ. देसाईज् किडनीस्टोन क्लिनिक’चा आता पूर्वोत्तर भारतातही विस्तार झाला आहे. ईशान्य भारतातील रुग्णांना त्यांच्याच भागात अत्याधुनिक व प्रभावी उपचार मिळावेत या उद्देशाने मणिपूर राज्याची राजधानी असलेल्या इम्फाल येथे नुकतेच ‘डॉ. देसाईज् किडनीस्टोन क्लिनिक’चे भव्य उद्घाटन करण्यात आले आहे.

गेल्या ३० वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या या क्लिनिकने कोणतीही शस्त्रक्रिया न करता केवळ विशेष होमिओपॅथिक औषधोपचारांच्या माध्यमातून हजारो रुग्णांना नवीन आयुष्य दिले आहे. बेळगावमधील आरपी रोड, टिळकवाडी येथे मुख्य शाखा असलेल्या या क्लिनिकचे संस्थापक डॉ. भूषण देसाई आणि डॉ. योगिता देसाई यांनी आपल्या विशेष उपचार पद्धतीतून वैद्यकीय क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. सुरुवातीला ‘मुतगे’ या गावातून सुरू झालेल्या या रुग्णसेवेचा विस्तार आता देशभरात होत असून रुग्णांना लांबचा प्रवास करावा लागू नये, हाच या क्लिनिकचा मुख्य उद्देश आहे.

या क्लिनिकमध्ये होमिओपॅथिक पद्धतीने ५ एमएम ते १५ एमएम आणि त्याहून मोठ्या आकाराचे स्टोन औषधांच्या मदतीने लघवीवाटे सहज बाहेर काढले जातात. याशिवाय किडनी फेल्युअर, नेफ्रोटिक सिंड्रोम, पायलोनेफ्रायटिस आणि युरेथ्रल स्ट्रक्चर यांसारख्या गंभीर आजारांवरही यशस्वी उपचार केले जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या रुग्णांना किडनीच्या गंभीर समस्यांमुळे डायलिसिसची तात्काळ गरज भासणार असते, अशा रुग्णांचे डायलिसिस औषधांच्या मदतीने रोखण्यात या क्लिनिकला मोठे यश आले आहे.

 belgaum

गोवा, गुजरात, आणि ईशान्य भारतातील रुग्णांच्या सोयीसाठी क्लिनिकने आपल्या शाखांचा विस्तार केला असून गोवा, विजापूर, मुधोळ आणि संकेश्वर येथील शाखा यशस्वीपणे कार्यरत आहेत. नुकत्याच इम्फाल (मणिपूर) येथील उद्घाटनानंतर आता महाराष्ट्रातील कोल्हापूर येथेही नवीन शाखा सुरू होत आहेत.

अधिक माहिती व संपर्कासाठी:
डॉ. देसाईज् किडनीस्टोन क्लिनिक
पत्ता: २ रा मजला, आरएनबी एमरल्ड, रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ, आरपीडी कॉर्नर, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव – ५९०००६.

मोबाईल नंबर: 8095025777, 9663224555, 9481214666

वेबसाईट: https://drdesaikidneystoneclinic.com

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.