बेळगाव लाईव्ह : आईला शिवीगाळ केल्याच्या रागातून एका २१ वर्षीय तरुणाने युवकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी मच्छे परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली.
मयूर बाळू पोटे (वय ३०)रा. मच्छे बेळगाव असे या जीवघेण्या हल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, जखमी मयूर पोटे यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून, सध्या त्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे.

या प्रकरणातील संशयिताचे नाव स्वप्नील कलखांबकर (वय २१) असे असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आईला शिवीगाळ केल्याच्या रागातून हा हल्ला केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या घटनेमागे अन्य कारणांचा समावेश आहे का, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास बेळगाव ग्रामीण पोलीस करत आहेत. घटनास्थळावरील परिस्थिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.




