belgaum

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांची रात्री पावसात पाहणी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील विसर्जन व्यवस्था आणि मिरवणूक मार्गांची पाहणी करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी मंगळवारी रात्री पावसात शहरातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली.

दुपारी गणेश महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वडगाव येथील दुरवस्था झालेल्या विसर्जन तलावाची पाहणी करून ही बाब पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर आयुक्त बोरसे यांनी रात्री स्वतः घटनास्थळी भेट देत तलावाची स्थिती आणि परिसरातील व्यवस्थेची पाहणी केली.

या पाहणीदरम्यान आयुक्त भूषण बोरसे आणि गणेश महामंडळाचे जन संपर्क प्रमुख विकास कलघटगी यांनी सुमारे तासभर पावसात शहरातील विविध भागांची पाहणी केली. महात्मा गांधी उद्यान परिसर, एसपीएम रोड, नाझर कॅम्प, वडगाव मुख्य रस्ता येथील विसर्जन तलाव, फोर्ट रोड-पी बी रोड ब्रिज रोड जंक्शन तसेच शनी मंदिर फाईव्ह रोड सर्कल परिसराची पाहणी करण्यात आली.

 belgaum

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डॉल्बी व इतर वाहनांची ये-जा, पुलावर होणारी वाहतूक कोंडी, नागरिकांची गर्दी तसेच मिरवणुकीच्या मार्गातील संभाव्य अडथळे याबाबतही पाहणी करण्यात आली. शनी मंदिर सर्कल परिसरात मिरवणुकीदरम्यान विशेष खबरदारी घेण्याची गरज असल्याचेही यावेळी स्पष्ट झाले.

दरम्यान, बेळगाव शहरातील सर्व नऊ विसर्जन तलावांची पोलीस आयुक्त भूषण बोरसे लवकरच पाहणी करणार आहेत. गणेशोत्सवाच्या काळात विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पडाव्यात आणि वाहतूक व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी प्रशासनाकडून तयारीला वेग आला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.