belgaum

डॉ. अंजली निंबाळकर यांच्यावर काँग्रेसची नवी जबाबदारी;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील सक्रिय नेत्या, खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांच्यावर पक्षाने आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. केपीसीसी अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी त्यांची राज्यातील ‘एसआयआर’ (Special Intensive Revision) प्रक्रियेसाठी कित्तूर कर्नाटक विभागाच्या निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे.


या नियुक्तीनुसार डॉ. निंबाळकर या बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण, चिक्कोडी, बागलकोट, विजयपुरा, गदग, हावेरी, उत्तर कन्नड, हुबळी शहर आणि धारवाड ग्रामीण या दहा जिल्ह्यांमध्ये पक्षाच्या ‘एसआयआर’ प्रक्रियेवर देखरेख ठेवणार आहेत.

स्थानिक काँग्रेस नेत्यांशी समन्वय साधणे, पक्षाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रक्रिया राबवली जात आहे का याचा आढावा घेणे आणि त्याबाबतचा सविस्तर अहवाल केपीसीसीकडे सादर करणे ही जबाबदारी त्यांच्याकडे असेल.

 belgaum


यापूर्वी एआयसीसीच्या वतीने गोव्यासह विविध राज्यांचे प्रभारी म्हणून काम करताना डॉ. अंजली निंबाळकर यांनी प्रभावी संघटन कौशल्य दाखवले आहे. त्याच अनुभवाच्या जोरावर कित्तूर कर्नाटक विभागातील काँग्रेसच्या ‘एसआयआर’ मोहिमेला अधिक बळ मिळेल, असा पक्षातील नेत्यांचा विश्वास आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.