belgaum

शेतात काम करताना वीज कोसळून दांपत्याचा मृत्यू

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यातील मूडलगी तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, शेतात काम करत असताना विजेचा धक्का लागून पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.

मूडलगी तालुक्यातील नागनूर गावाच्या शिवारात ही घटना घडली. मुत्तप्पा श्रीशैल मुगोळखोडे आणि राजश्री मुगोळखोडे अशी मृत दांपत्याची नावे आहेत.

नेहमीप्रमाणे शेतात कृषी कामे करत असताना, अचानक तुटलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मूडलगी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 belgaum

दांपत्याच्या आकस्मिक निधनाने मुगोळखोडे परिवारासह संपूर्ण नागनूर गावावर शोककळा पसरली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.