belgaum

मनपाकडून मतदारांच्या मदतीसाठी विशेष हेल्पलाईन केंद्र

0
City corporation logo
City corporation logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना मतदार यादी संदर्भातील प्रक्रियेत मदत करण्यासाठी महानगरपालिकेमध्ये विशेष हेल्पलाईन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. मनपा आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी कार्तिक एम. यांनी या केंद्राचे उद्घाटन करून नागरिकांना याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

मतदारांना बीएलओमार्फत वाटप करण्यात आलेले सर्वेक्षण अर्ज भरून २९ जुलैपर्यंत जमा करणे बंधनकारक आहे. या अर्जांमध्ये कोणतीही चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरू नये; काही शंका असल्यास मतदारांनी थेट हेल्पलाईन केंद्राशी संपर्क साधावा, असे कार्तिक एम. यांनी स्पष्ट केले.

या संदर्भातील तांत्रिक बाबींवर बोलताना महसूल उपायुक्त डॉ. सिद्धू हुल्लोळी यांनी सांगितले की, मतदारांनी २००२ च्या मतदार यादीचा आधार घेऊनच अर्जातील तपशील भरावा. मोबाईलवरूनही ही माहिती भरण्याची सुविधा असून दोन्ही मतदारसंघांत जवळपास ९० टक्के अर्जांचे वाटप पूर्ण झाले आहे. डिजिटल नोंदणीचे काम युद्धपातळीवर सुरू असून नागरिकांच्या सहकार्याने ही मोहीम वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास डॉ. सिद्धू हुल्लोळी यांनी व्यक्त केला.

 belgaum

प्रशासन उपायुक्त उदयकुमार टी. यांनी सांगितले की, काही प्रभागांमध्ये अर्ज वाटपाचा वेग कमी असल्यास वरिष्ठ अधिकारी तेथे प्रत्यक्ष भेट देऊन अडचणी दूर करतील. नागरिकांनी स्वतःहून चुकीची माहिती न भरता बीएलओ किंवा हेल्पलाईन कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी, असे आवाहन उदयकुमार टी. यांनी केले. या प्रसंगी मनपा परिषद सचिव लक्ष्मी निप्पाणीकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.