belgaum

ब्लॅक स्पॉट’ संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील अपघातप्रवण क्षेत्रे (ब्लॅक स्पॉट) सुरक्षित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पंचायत सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्ह्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीत राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच जिल्हा मार्गांवरील अपघातप्रवण ठिकाणांचा आढावा घेण्यात आला. वारंवार अपघात घडणाऱ्या ठिकाणी रस्त्यांतील त्रुटी, अपुऱ्या सूचना फलकांची समस्या, धोकादायक वळणे, खराब रस्ते, अपुरी प्रकाशयोजना, तसेच वाहतूक व्यवस्थेतील अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना अपघातप्रवण ठिकाणांची तातडीने पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती, इशारा फलक, रिफ्लेक्टर, स्पीड ब्रेकर, रस्ते चिन्हांकन आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजना तात्काळ राबविण्याचे निर्देश दिले.

 belgaum

नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट करत विविध विभागांनी समन्वयाने काम करून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी जिल्ह्यातील विविध ब्लॅक स्पॉटवरील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांनी ही कामे निश्चित कालावधीत पूर्ण करून त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करावा, असेही निर्देश देण्यात आले.

या बैठकीला बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. के. रामराजन यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वाहतूक विभाग आणि इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.