belgaum

स्वतःलाच मालक दाखवून सेल डीड करणारा आरोपी अटकेत

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : उपनोंदणी कार्यालयात स्वतःलाच मालमत्तेचा मूळ मालक असल्याचे भासवून दुसऱ्याची मालमत्ता परस्पर विक्री केल्याप्रकरणी मार्केट पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. बनावट ओळख वापरून मूळ मालकाच्या जागी बसत मालमत्तेची नोंदणी केल्याचे तपासात उघड झाले आहे.

मार्केट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उचगाव येथील रफीक इमाम शहापूरकर (वय ५७) यांनी १० जानेवारी २०२५ रोजी याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या मालकीची मालमत्ता फसवणुकीच्या माध्यमातून परस्पर विक्री करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. या तक्रारीवरून मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०६/२०२५ दाखल करण्यात आला असून भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४१९, ४६५, ४६८, ४७१ आणि ४७४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

तपासादरम्यान पोलिसांनी लक्ष्मण अर्जुन देसाई (वय ६२, रा. सिद्धेश्वर गल्ली, पीरनवाडी, बेळगाव) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत आरोपीने फिर्यादीच्या चुलत्याच्या नावाने उपनोंदणी कार्यालयात स्वतःलाच मालमत्तेचा मूळ मालक म्हणून हजर राहून, मूळ मालकाच्या जागी बसत वेबकॅमेऱ्यासमोर छायाचित्र काढले, अंगठ्याचा ठसा आणि स्वाक्षरी करून संबंधित मालमत्तेची खरेदी-विक्री नोंदणी दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर केल्याचे निष्पन्न झाले.

 belgaum

या बनावट व्यवहारामुळे फिर्यादी तसेच त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक फसवणूक झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी २८ जुलै २०२६ रोजी आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

या गुन्ह्याचा तपास करून आरोपीचा शोध लावण्यात आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची, पोलीस उपनिरीक्षक एच. एल. केरूर तसेच त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांनी संबंधित पथकाचे कौतुक केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.