belgaum

शहर काँग्रेस अध्यक्षपदावरून पुन्हा राडा;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: शहर काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीवरून बेळगाव जिल्हा काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा गटबाजी उफाळून आली. जिल्हा काँग्रेस कार्यालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत माजी नगरसेवक फईम नाईकवाडी समर्थक आणि विद्यमान नगरसेवक अजीम पटवेगार समर्थक यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. काही काळ कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण बनले होते.

गेल्या दोन दिवसांपासून एआयसीसीच्या वतीने शहर काँग्रेस अध्यक्षपदासाठी स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, अध्यक्षपदासाठी कोणाची निवड करावी यावर विविध गटांमध्ये एकमत न झाल्याने मतभेद उघडपणे समोर आले.

बैठकीदरम्यान माजी नगरसेवक फईम नाईकवाडी आणि विद्यमान नगरसेवक अजीम पटवेगार यांनी आपापल्या गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देताना जोरदार शाब्दिक चकमक केली. वाद वाढल्याने काही काळ जिल्हा काँग्रेस कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

 belgaum

दरम्यान, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी तत्काळ मध्यस्थी करत दोन्ही गटांतील नेत्यांची समजूत काढली. पक्षहित लक्षात घेऊन शांतता राखावी आणि अंतिम निर्णय हायकमांड घेणार असल्याचे सांगत त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

शहर काँग्रेस अध्यक्ष निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच पुन्हा एकदा गटबाजी उघड झाल्याने काँग्रेसमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. आता हायकमांड अध्यक्षपदाची जबाबदारी नेमकी कोणाकडे सोपवणार, याकडे कार्यकर्ते आणि नेत्यांचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे, याच अध्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान सोमवारीही जिल्हा काँग्रेस कार्यालयात दोन गटांमध्ये मोठा गोंधळ झाला होता. त्यावेळी धक्काबुक्की आणि मारामारीची घटना घडल्याचा आरोप करण्यात आला होता. सलग दुसऱ्या दिवशीही झालेल्या वादामुळे बेळगाव शहर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.