belgaum

‘अविभाज्य’ ठरावाच्या नावाखाली कन्नड संघटनांचे जुनेच पाढे!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : सीमाभागाच्या अस्मितेला वारंवार डिवचत, बेळगाव महापालिकेत ‘बेळगाव हा कर्नाटकाचा अविभाज्य भाग आहे’ असा बळजबरीने ठराव मंजूर करून घेण्यासाठी कन्नड संघटनांनी पुन्हा एकदा आपले नेहमीचेच तुणतुणे वाजवायला सुरुवात केली आहे.

बेळगाव महापालिकेत संबंधित ठराव तातडीने मंजूर करण्यासाठी कन्नड संघटनांच्या प्रतिनिधींनी बेळगाव दौऱ्यावर आलेल्या नगरविकास मंत्री यतिंद्र सिद्दरामय्या यांची भेट घेत सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. यापूर्वीही मुख्यमंत्री, मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हीच जुनी रडगाणी गात निवेदने सादर करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, हा ठराव मंजूर न झाल्यास थेट महापालिकाच बरखास्त करण्याची दर्पोक्ती करत या संघटनांकडून पुन्हा तोच कित्ता गिरविण्याचा प्रयत्न सुरु आहहे.

विशेष म्हणजे, या वल्गनांसमोर लोटांगण घालीत नगरविकास मंत्र्यांनीही ‘बेळगाव कर्नाटकाचा अविभाज्य भाग आहे’ अशी एकतर्फी भूमिका घेत जुनेच पाढे वाचले. संबंधित पत्र आपल्या निदर्शनास आले नसल्याचे सांगत वेळ मारून नेणाऱ्या मंत्र्यांनी, दुसरीकडे कायद्यानुसार कारवाईचे संकेत देत कन्नड संघटनांच्या या सुनावणीला आणि थयथयाटाला अप्रत्यक्षपणे खतपाणीच घातले .

 belgaum

सरकारवर कोणताही राजकीय दबाव नसल्याचा दावा मंत्र्यांकडून केला जात असला, तरी कन्नड संघटनांच्या दबावाखाली येऊन मराठी भाषिकांवर हा अन्यायकारक दबाव लादला जात असल्याचा आरोप मराठी संघटनांकडून होत आहे.

सीमाभागातील वातावरण ढवळून काढण्यासाठी कन्नड संघटनांनी पुन्हा एकदा आपल्या अरेरावी वल्गना आणि धमकावण्याचे सत्र सुरू केले आहे. बेळगाव महापालिकेत ‘बेळगाव हा कर्नाटकाचा अविभाज्य भाग आहे’ असा बळजबरीने ठराव मंजूर करण्यासाठी धडपडणाऱ्या या संघटनांनी, ठराव न झाल्यास थेट महापालिका बरखास्त करण्याची दर्पोक्ती आणि पोकळ वल्गना कन्नड संघटनांकडून केल्या जात असून या अरेरावी धोरणामुळे मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.