belgaum

कॅम्प भागात मध्यरात्री वडाच्या झाडाची फांदी कोसळली;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील कॅम्प भागातील बेम्बळूर रस्त्यावर मध्यरात्री वडाच्या झाडाची मोठी फांदी कोसळल्याने वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच कॅन्टोन्मेंट मंडळाचे माजी उपाध्यक्ष साजिद शेख यांनी घटनास्थळी धाव घेत कर्मचाऱ्यांच्या मदतीने झाड हटवून वाहतूक सुरळीत केली.

शनिवारी मध्यरात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास वडाच्या झाडाची मोठी फांदी अचानक तुटून रस्त्यावर पडली. त्यामुळे या मार्गावरील वाहनांची वाहतूक बंद झाली. झाड कोसळताना वीजवाहिन्याही तुटून रस्त्यावर आल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली होती.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर आज सकाळी कॅन्टोन्मेंट कार्यालयातील अधिकाऱ्यांनी माजी उपाध्यक्ष साजिद शेख यांच्याशी संपर्क साधला. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी स्वतः जेसीबीवर उभे राहून कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांच्या मदतीने झाडाच्या फांद्या हटविण्याचे काम केले.

 belgaum

काही तासांच्या प्रयत्नांनंतर रस्त्यावर पडलेले झाड पूर्णपणे हटविण्यात आले आणि वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. साजिद शेख यांनी दाखविलेल्या तत्परतेचे आणि प्रत्यक्ष सहभागाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.