belgaum

राजर्षी शाहू जयंतीनिमित्त दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही राजर्षी शाहू छत्रपती महाराज जयंतीचे औचित्य साधून दहावी (एस.एस.एल.सी.) परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी बेळगाव शहर व बेळगाव तालुक्यातील मराठी माध्यमांच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना पात्र विद्यार्थ्यांची माहिती पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील एस.एस.एल.सी. परीक्षेत बेळगाव शहर आणि बेळगाव तालुका विभागात सर्वाधिक गुण मिळवून प्रथम आलेल्या प्रत्येकी एका विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीस ५ हजार रुपये रोख पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच या दोन्ही विभागांतील प्रत्येक शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या एका विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीस १ हजार रुपये रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

यासाठी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील पात्र विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीची माहिती शाळेच्या लेटरहेडवर सही व शिक्क्यासह पाठवावी.

 belgaum

या माहितीत विद्यार्थ्याचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि प्राप्त गुण यांचा समावेश असावा. ही माहिती मंगळवार, दि. ३० जून २०२६ पर्यंत सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत पोस्टाने किंवा प्रत्यक्ष सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

गौरव समारंभाची तारीख, वेळ आणि स्थळ याबाबतची माहिती संबंधित विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे कळविण्यात येणार असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापकांनी पात्र विद्यार्थ्यांची नावे वेळेत पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष नेताजी जाधव आणि कार्यवाह सौ. लता पाटील यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.