belgaum

उत्तर प्रदेशातील आंतरराज्यीय चोरांची टोळी बेळगाव पोलिसांच्या जाळ्यात

0
SP RAMRAJAN
 belgaum

बेळगाव लाईव्ह : एसटी बसमध्ये कृत्रिम गर्दी करून प्रवाशांचे लक्ष विचलित करत सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका आंतरराज्य टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ११ सराईत चोरांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अथणी उपविभागांतर्गत येणाऱ्या कागवाड आणि अथणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवाशांचे सामान सुरक्षित ठेवण्याचे आमिष दाखवून बॅगांमधील दागिने चोरण्याच्या तक्रारी आल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून उत्तर प्रदेशातील या ११ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत, असे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी सांगितले. या टोळीने कागवाड येथे चार, चिक्कोडी येथे एक आणि अथणी येथे एक अशा एकूण सहा चोऱ्या केल्याची कबुली दिली असून पोलिसांनी या सर्व गुन्ह्यांची उकल केली आहे.

 belgaum
SP RAMRAJAN

अटक करण्यात आलेले चोरटे प्रवासात महागडे कपडे आणि दागिने परिधान केलेल्या प्रवाशांना लक्ष्य करत असत. या टोळीकडून २२५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आगामी काळात बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून साध्या वेशातील पोलीस तैनात केले जातील, असे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी स्पष्ट केले. तसेच प्रवाशांनी प्रवासादरम्यान स्वतःच्या सामानाची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.