belgaum

शिवाजी विद्यापीठाचे बेळगावमध्ये 25 रोजी प्रवेश माहितीपर शिबिर

0
Shivaji university
 belgaum

बेळगाव लाईव्ह :शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शैक्षणिक केंद्रातर्फे बेळगावमध्ये येत्या गुरुवार दि. 25 जून 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता विविध पदविका व ऑनलाईन अभ्यासक्रमांबाबत प्रवेश माहितीपर शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

ओरिएंटल इंग्लिश मेडियम स्कूल जवळील श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन (मराठा मंदिर, खानापूर रोड, बेळगाव) येथे होणाऱ्या या शिबिरात एम.ए., एम.कॉम., बी.ए., बी.कॉम., एम.बी.ए. या पारंपारिक अभ्यासक्रमांसोबत ऑनलाईन एम.बी.ए.,

ऑनलाईन एम.कॉम., ऑनलाईन एम.एससी. (गणित) आणि विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची माहितीही विद्यार्थ्यांना व पालकांना दिली जाईल. शिबिरात प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम संरचना, फी संबंधित माहिती आणि करिअर मार्गदर्शन देण्यात येईल. तरी बेळगाव

 belgaum

सीमाभागातील विद्यार्थी आणि पालकांनी या शिबिराला उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.