belgaum

हेरॉईन विक्रीप्रकरणी एकाला अटक, १.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

0
Police logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह |बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत हेरॉईन (ब्राऊन शुगर) विक्रीसाठी आलेल्या एका संशयिताला अटक केली आहे. या कारवाईत सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जून २०२६ रोजी मंगेश दयानंद तळकर (वय २९, रा. वैभव कॉलनी, गणेशपूर, Belgaum) हा बेनकनहळ्ळी परिसरातील सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या फायद्यासाठी हेरॉईनची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधारे बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय संतोष दळवाई आणि त्यांच्या पथकाने छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडून ७.९४ ग्रॅम हेरॉईन (ब्राऊन शुगर) किंमत १ लाख ६० हजार रुपये, १५ हजार रुपये किमतीची डिओ स्कूटर आणि ५ हजार रुपये किमतीचा विवो मोबाईल असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 belgaum

या प्रकरणी आरोपीविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६७/२०२६ नोंद करण्यात आला असून, एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, ही यशस्वी कारवाई करणारे पीएसआय संतोष दळवाई, एएसआय आणि त्यांच्या पथकाचे शहराचे पोलीस आयुक्त आणि उपपोलीस आयुक्त यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.