belgaum

अर्जुन गोरल यांचे निधन ही सीमाभागाची मोठी हानी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ व कणखर नेते अर्जुन गोरल यांच्या निधनामुळे सीमाभागातील चळवळीत कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. येळळूरमध्ये आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत मान्यवरांनी त्यांच्या स्मृतीस उजाळा देत श्रद्धांजली वाहिली. सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा सूर या सभेत उमटला.

येळळूरचे सुपुत्र आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते अर्जुन गोरल यांच्या निधनानिमित्त रविवारी सायंकाळी श्री चांगळेश्वरी मंदिरामध्ये सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. अर्जुन गोरल हे कडक शिस्तीचे आणि स्पष्टवक्ते नेते होते.

त्यांनी नेहमी येळळूर गावाला योग्य दिशा देण्याचे काम केले. समाजासाठी लढणारा एक लढाऊ नेता गमावल्यामुळे गावाची अपरिमीत हानी झाली आहे, अशा भावना शोकसभेत व्यक्त करण्यात आल्या. सीमाप्रश्नाचा निकाल लागेपर्यंत सर्वांनी एकजुटीने लढण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.

 belgaum

शोकसभेच्या अध्यक्षस्थानी वामनराव पाटील होते. सभेच्या सुरुवातीला वामनराव पाटील आणि माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील यांनी दिवंगत अर्जुन गोरल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. यानंतर प्रकाश अष्टेकर यांनी प्रास्ताविक केले.

शोकसभेत दत्ता उघाडे, सी. एम. गोरल, बबन कानशिडे, किरण अण्णा पाटील, डी. जी. पाटील, आनंद पाटील, पी. ए. पाटील, दुधाप्पा बागेवाडी, प्रकाश तोपिनकट्टी, धाकलू करविनकोप, उदय जाधव, माजी जिल्हा पंचायत सदस्य दिलीप कांबळे आणि परशराम मोटराचे आदींनी आपले विचार मांडले. अर्जुन गोरल यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा आढावा घेत या सर्व मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

या शोकसभेला सतीश देसुरकर, सुरज गोरल, दयानंद उघाडे, दामू अण्णा परीट, कृष्णा शहापूरकर, नागेश बोबाटे, शिवाजी कदम, शिवाजी गोरल, अजित गोरल, प्रकाश मालुचे, रमेश मेणसे, डॉ. विकास मेणसे, अशोक चौगुले, अनिल पाटील, नेताजी गोरल, राकेश परीट, रमेश पाटील, सी. बी. पाटील, अनंत पाटील, दौलत पाटील, बाळू धामणेकर, कृष्णा बिजगरकर, लक्ष्मी मासेकर, सुवर्णा बिजगरकर, रूपा पुन्यान्नावर,

अनुसया परीट, जोतिबा उडकेकर, तुकाराम टक्केकर, रामदास धुळजी, परशराम घाडी, मारुती तुळजाई, मधू कुगजी, रणजित गोरत, गणपती हट्टीकर, रामा पाखरे, बाळू पाटील, प्रकाश पाटील, रमेश धामनेकर, वसंत पाटील, भरत मासेकर, सी. एस. पाटील, गजानन पाटील, रघुनाथ मुरकुटे, परशराम कंग्राळकर, यल्लाप्पा पाटील, प्रकाश गोरल, सचिन दळवी (मंडोळी) आणि मोरे (सावगाव) यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.