belgaum

संतापजनक प्रकार : मराठी शाळेच्या नामफलकावर थेट शौचालयाचा फलक

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : शहरातील सर्वात जुन्या मराठी शाळांपैकी एक असलेल्या गणपत गल्ली येथील आदर्श सरकारी मराठी मुलांची शाळा नं. 2 च्या नामफलकावर थेट शौचालयाचा फलक लावण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे नागरिक आणि मराठीप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गणपत गल्ली परिसरातील शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावरील नामफलकावर एका सेवाभावी संस्थेचा ‘पे अँड यूज टॉयलेट ब्लॉक्स’ असा फलक लावण्यात आला होता.

ही बाब समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते गंगाधर पाटील आणि नगरसेवक शंकर पाटील यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत तात्काळ शौचालयाचा फलक हटवला. त्यानंतर आदर्श सरकारी मराठी मुलांची शाळा नं. 2 चा नवा फलक पुन्हा त्या ठिकाणी लावण्यात आला.

 belgaum

शाळेचा जुना आणि दुर्लक्षित नामफलक पाहून प्रसिद्धीसाठी त्याचा गैरफायदा घेत हा प्रकार करण्यात आला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र सरकारी शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी शासनाकडून विविध मोहिमा राबवल्या जात असताना मराठी शाळांच्या ओळखीवरच गदा आणणारा हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.

या घटनेमुळे मराठी शाळांकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला असून मराठी शाळांचा सन्मान राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरत आहे.

सदर संस्थेच्या वतीने हा शौचालयाचा फलक २०१८ साली महापालिका प्रशासनाची परवानगी व विनंतीनुसार बसवण्यात आला होता. त्यावेळी परिसरातील महिला व पुरुषांना सार्वजनिक शौचालयाची मोठी समस्या भेडसावत असल्याने हा फलक लावण्यात आल्याची माहिती संबंधित संस्थेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे जाणूनबुजून मराठी किंवा सरकारी शाळेचा फलक काढण्यात आलेला नसल्याचेही संस्थेने स्पष्ट केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.