बेळगाव लाईव्ह : अखिल भारतीय मराठा जागृती मंच, पानिपत यांच्या कोल्हापूर शाखेतर्फे आयोजित ‘रोड मराठा’ स्नेह मेळावा गुरुवारी शाहू स्मारक भवन येथे उत्साहात पार पडला. खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात पानिपतचे रोड मराठा बांधव आणि बेळगावचे सीमावासीय प्रतिनिधी यांच्यातील ऐतिहासिक ऋणानुबंधाचा प्रत्यय आला.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेल्या डॉ. वसंतराव मोरे यांनी पानिपतच्या युद्धाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “पानिपत हा पराभव नसून पराक्रम आहे. या पराक्रमानंतर कोणत्याही परकीय आक्रमकाने भारतावर चालून येण्याचे धाडस केले नाही.”
शिवसंदेश भारत ग्रुप आणि यश ऑटो समूहातर्फे सीमावासीय प्रतिनिधींनी खासदार शाहू महाराज व डॉ. मोरे यांचा स्मृतिचिन्ह आणि राजमुद्रा देऊन सत्कार केला. यावेळी “सीमाभाग महाराष्ट्रात सामील झालाच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
डॉ. वसंत मोरे यांनी इतिहासावर आधारित प्रेक्षकांच्या शंकांचे सविस्तर निरसन केले. अध्यक्षीय भाषणात खासदार शाहू महाराजांनी हे ऐतिहासिक संबंध भविष्यात अधिक दृढ करण्यावर भर दिला.
सीमावासीयांचे प्रतिनिधी संजय रुकमाना मोरे यांनी पानिपतच्या लढाईची गाथा मांडली, ज्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. बेळगावमधून प्राचार्य एल. पी. पाटील, निवृत्त सुभेदार मेजर केदारी मोटकर आणि संदीप तरळे यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली.
कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूरच्या विविध संघटनांनी केले होते. मिलिंद पाटील यांनी आभार मानले आणि एका भावूक वातावरणात या मेळाव्याची सांगता झाली.
कोल्हापुरात पानिपतच्या ‘रोड मराठा’ बांधवांचा स्नेह मेळावा; सीमावासीयांची लक्षणीय उपस्थिती

कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूरच्या विविध संघटनांनी केले होते. मिलिंद पाटील यांनी आभार मानले आणि एका भावूक वातावरणात या मेळाव्याची सांगता झाली.सीमावासीयांची लक्षणीय उपस्थिती