belgaum

रविवारची ‘दारू पार्टी’ पडली महागात;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशनाविरोधात पोलिसांनी रविवारी शहर आणि ग्रामीण भागात धडक कारवाई करत सात जणांना ताब्यात घेतले. विविध ठिकाणी खुलेआम दारू पित बसलेल्या या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुंडय्या सुरेश हिरेमठ (वय 45), रेवप्पा मलगौडा पाटील (वय 40, दोघेही रा. पंत बाळेकुंद्री बेळगाव), राहुल बाबुराव जाधव (वय 36, रा. महात्मा फुले रोड बेळगाव), आकाश केदारी लोहार (रा. हिंद इंजीनियरिंग कंपनी जवळ बेळगाव), अबूबकर शहापूरकर (वय 37, रा. चौथा क्रॉस अंजनेनगर बेळगाव), समीर शेख (वय 37, रा. जाफरवाडी, ता. जि. बेळगाव) आणि परशुराम माणिक हनमंताचे (वय 38, रा. लक्ष्मी गल्ली हलगा, ता. जि. बेळगाव) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

यापैकी मुंडय्या व रेवप्पा हे मोदगा गावाच्या हद्दीतील सुळेभावी -मोदगा रस्त्यावर एमएसआयएल जवळ सार्वजनिक ठिकाणी दारू पीत बसले असता मारीहाळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ हुलगुंदा व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोघाही आरोपींना पकडले.

 belgaum

दुसऱ्या प्रकरणात राहुल व आकाश हे दोघे बेळगाव जुन्या भाजी मार्केट जवळ सार्वजनिक ठिकाणी दारू पीत असताना मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनीकंठ पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले. तिसऱ्या प्रकरणात अलतगा गावाच्या व्याप्तीतील अलतगा खडी मशीन जवळील सार्वजनिक स्थळी दारू पीत असलेल्या अबूबकर याला काकती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ मठद व त्यांच्या सहकाऱ्यांनी ताब्यात घेतले.

चौथ्या प्रकरणात समीर शेख हा देखील अलतगा खडी मशीन जवळील सार्वजनिक स्थळी काकती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांना दारू पिताना सापडला.

पाचव्या प्रकरणात बस्तवाड गावाच्या व्याप्तीतील युगादी डेव्हलपर्स जवळ सार्वजनिक ठिकाणी दारू पीत बसलेल्या परशराम हनुमंताचे याला हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश व त्यांच्या सहकाऱ्यांनी अटक केली. उपरोक्त प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंद झाला आहे.

सर्व आरोपींविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंद करण्यात आले असून सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांवर अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.