belgaum

ऑनलाइन कॅब बुकिंगद्वारे एकाची 99 हजाराची फसवणूक

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :ऑनलाइन भाड्याची गाडी बुक करण्याच्या प्रयत्नात बेळगाव येथील एका रहिवाशाची 99,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

प्रादेशिक आयुक्त कार्यालयात कर्मचारी असलेले संजीव मुत्तेप्पागोळ असे फसवणूक झालेल्या बेळगावच्या रहिवाशाचे नांव आहे. संजीव यांनी विमानतळावर जाण्यासाठी भाड्याची ऑनलाइन कॅब शोधल्यानंतर ‘लक्ष्मी कार रेंटल गोवा’शी संबंधित नीलम राजपूत नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधला.

त्यांना ‘कार रेंटल’ नावाचे ॲप डाउनलोड करण्यास आणि फोनपेद्वारे 149 रुपये भरण्यास सांगण्यात आले. मदत करण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्याने त्यांना गूगल मीटवर त्यांची स्क्रीन शेअर करण्यास सांगितले.

 belgaum

त्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्याने संजीव यांच्या बँक खात्याचा तपशील मिळवण्याद्वारे त्यांच्या नकळत खात्यातील 99,000 रुपये लंपास केले. स्रोत: टीओआय

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.