belgaum

कॅन्टोन्मेंट हद्दीत बी. के. मॉडेल समोर ‘खाऊ कट्टा’ उभारण्याचा प्रस्ताव

0
150
Bgm cantt
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह :महसूल वाढी संदर्भात बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीत महसूल वाढीसाठी बी. के. मॉडेल शाळेसमोर कॅन्टोन्मेंट हद्दीत ‘खाऊ कट्टा’ उभारण्याबरोबरच रेल्वे स्टेशन समोर लॉज आणि कॅन्टोन्मेंट कॉम्प्लेक्समध्ये पहिला मजला उभारणे यावर चर्चा झाली.

सदर बैठकीस कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ सुदाम मंचलवार, सदस्य सुधीर तुपेकर आणि अधिकारीवर्गासह नागरिक उपस्थित होते. बैठकीत नवीन व्यावसायिक प्रकल्पांद्वारे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा महसूल वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.

जास्तीत जास्त परताव्यासाठी उपलब्ध जमीन आणि पायाभूत सुविधांचा इष्टतम वापर, नागरिक आणि प्रवाशांसाठी उत्तम सोयीसुविधा, मंडळाचे भक्कम आर्थिक भविष्य, नागरिकांचे अभिप्राय आणि दीर्घकालीन फायदे लक्षात घेऊन प्रकल्पाचे नियोजन आणि महसूल वाढवण्यासाठी शाश्वत व्यावसायिक मालमत्ता निर्माण करणे हे बैठकीचे महत्त्वाचे मुद्दे होते. त्या अनुषंगाने केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या 7 कोटी रुपयांच्या निधी सोबतच आणखी 7 कोटी रुपयांची रक्कम जमा करून एकूण 14 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

नागरिकांची थेट संवाद साधत त्यांच्या सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. त्यावेळी बोर्डाचे माजी उपाध्यक्ष साजिद शेख यांनी विशेषतः बी.के. मॉडेल स्कूलजवळ विरुद्ध बाजूला कॅन्टोन्मेंट हद्दीत आयनॉक्सपर्यंत ‘खाऊ कट्टा’ (फूड कोर्ट) स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. फूड कोर्ट प्रकल्पासाठी कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासून थिएटर परिसरापर्यंतच्या मोकळ्या जागेचा वापर करण्याची सूचनाही त्यांनी केली.

बैठकीमध्ये लॉजिंग सुविधा विकसित करण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्यासाठी कॅन्टोन्मेंट कॉम्प्लेक्सच्या कंपाउंड लगत पहिल्या मजल्यावर दुकाने बांधून भाडेतत्त्वावर देण्याचा पर्याय सुचविण्यात आला. तसेच रेल्वे स्टेशनसमोर एक लॉज बांधण्याचा प्रस्ताव मांडला गेला.

उपस्थित नागरिकांनी परिसरातील कचऱ्याच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधताना अनेक ठिकाणी नियमित साफसफाई होत नसल्याची तक्रार केली. बैठकीला उपस्थित असलेल्यांमध्ये साजिद शेख यांच्यासह विक्रम पुरोहित, रंजन शेट्टी अल्लाउद्दीन किल्लेदार आदी कॅम्प परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.