belgaum

माऊलींच्या पालखी सोहळ्याला 8 जुलै रोजी प्रारंभ;

0
287
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सालाबाद प्रमाणे आषाढी वारीसाठी येत्या दि. 8 पासून दि. 29 जुलै 2026 पर्यंत श्री क्षेत्र आळंदी ते श्रीक्षेत्र पंढरपूर अशा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा -2026 चे आयोजन करण्यात आले आहे.

आषाढी वारीसाठी संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे दि. 8 जुलै रोजी आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. सदर पालखी सोहळा 24 जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार असून परंपरेनुसार तीन उभी रिंगणे व चार गोल रिंगणे होतील पुणे आणि सासवड येथे सोहळा प्रत्येकी दोन दिवस मुक्कामी राहणार असून अन्य ठिकाणी प्रत्येकी एक दिवस मुक्काम करेल.

संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासाला 29 जुलै रोजी प्रारंभ होणार आहे. हा पालखी सोहळा 33 दिवसांचा प्रवास करून दि. 8 ऑगस्ट रोजी आळंदी येथे परतणार आहे.

 belgaum

आळंदी देवस्थानाचे विश्वास आणि दिंडी समाज संघटना यांची काल बुधवारी सोहळ्याचे मालक राजेंद्र आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यामध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्याचे खालील प्रमाणे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.