belgaum

दिवसाढवळ्या घरफोडी करणारा सराईत चोरटा जेरबंद

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : मारिहाळ पोलीस ठाणे पोलिसांनी दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक करून तब्बल 23 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात मोठे यश मिळवले आहे. या कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दि. 10 मे 2026 रोजी शिंदोळी गावातील महालक्ष्मीपूरम नगर येथे कुलूप लावलेल्या घराचा दरवाजा फोडून अज्ञात चोरट्याने घरातील 42 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी मारिहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घरफोडीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले होते. दि. 25 मे रोजी शिंदोळी परिसरात गस्त घालत असताना एका संशयित इसमाची हालचाल पोलिसांना संशयास्पद वाटली. त्याची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. पोलिसांनी अधिक चौकशीचा बडगा उगारताच त्याने घरफोडीची कबुली दिली.

 belgaum

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विश्वनाथ दुर्गप्पा मुत्तूर (वय 26, रा. बेविनमट्टी, जि. बागलकोट) असे असून तो मजुरीचे काम करत होता. आरोपी हा मारिहाळ पोलीस ठाण्यातील तीन तसेच काकती पोलीस ठाण्यातील एका घरफोडी प्रकरणात सहभागी असल्याचे तपासात उघड झाले आहे.

पोलिसांनी आरोपीकडून सुमारे 134 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 510 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण सुमारे 23 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आय. आर. पटनशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या यशस्वी मोहिमेबद्दल संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.