belgaum

बेळगावमध्ये १८ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई

0
112
SP RAMRAJAN
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यामध्ये वाढत्या गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांमध्ये वारंवार सहभागी असणाऱ्या १८ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याचे धाडसी आदेश दिले आहेत.

बेळगाव जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून गोकाक, निपाणी, सौंदत्ती, रामदुर्ग आणि हुक्केरी या भागांतील काही समाजकंटकांनी आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

यामध्ये मटका, गांजा तस्करी यांसारख्या अवैध व्यवसायांसह सोशल मीडियाच्या माध्यमातून शस्त्रांचे प्रदर्शन करून भीती पसरवणाऱ्या तरुणांचाही समावेश आहे. या सर्वांच्या गुन्हेगारी नोंदी तपासून त्यांना बेळगाव जिल्ह्यातून ६ महिने ते १ वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

 belgaum

जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना कोणाचीही भीती वाटू नये, यासाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून आगामी काळात आणखी काही गुन्हेगारांची यादी तयार करण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.