belgaum

‘अँटी स्टॅबिंग स्क्वॉड’कडून दोन गुन्हेगारांना शस्त्रांसह अटक

0
100
cop borase
cop borase
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या ‘अँटी स्टॅबिंग स्क्वॉड’ने विशेष मोहीम राबवून दोन जणांना घातक शस्त्रांसह अटक केली आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही धडक तपासणी मोहीम राबवण्यात आली.

कणबर्गी येथील ज्योतिर्लिंग गल्लीत अमोल श्रीकांत वाघ (वय ३०) हा तरुण हातात लोखंडी तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवण्याच्या आणि गुन्हेगारी कृत्य करण्याच्या उद्देशाने तो उभा असताना, माळमारुती पोलीस ठाण्याचे पीएसआय पी. एम. मोहिते आणि त्यांच्या पथकाने त्याला तलवारीसह रंगेहात पकडले. त्याच्याविरुद्ध आर्म्स अ‍ॅक्ट आणि कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत, खडेबाजार पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील कोनवाळ गल्लीत शशिकांत शिवराज अरकेरी (वय २७, रा. काकतीवेस रोड) याला संशयास्पद रित्या फिरताना पकडण्यात आले. झडती घेतली असता त्याच्याकडे एक धारदार चाकू मिळून आला. पीएसआय आनंद आदगोंडा आणि कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन चाकू जप्त केला.

 belgaum

शहरातील वाढत्या ‘स्टॅबिंग’ प्रकरणांना आळा घालण्यासाठी ही विशेष मोहीम सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राबवली जात आहे. “सार्वजनिक ठिकाणी भीती निर्माण करणाऱ्या किंवा घातक शस्त्रे बाळगणाऱ्यांची माहिती नागरिकांनी तातडीने १०० किंवा ११२ या क्रमांकावर द्यावी,” असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.