belgaum

हेरॉईनची विक्री करणारा युवक गजाआड;

0
Cop bgm
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील मुतगा -शिंदोळी रस्त्याशेजारी सार्वजनिक ठिकाणी हेरॉईन या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका युवकाला अटक करून सीसीबी पोलिसांनी त्याच्या जवळील 3 लाख 28 हजार रुपये किमतीच्या हेरॉईनसह एकूण 3,33,220 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव समीर मोहम्मदशरीफ मुल्ला (वय 21, रा. जनता प्लॉट शिंदोळी, बेळगाव) असे आहे. समीर हा काल बुधवारी स्वतःच्या स्वार्थासाठी मुतगा -शिंदोळी रस्त्याशेजारी झाडी असलेल्या सार्वजनिक ठिकाणी हेरॉईन या अंमली पदार्थाची विक्री करत होता.

त्यावेळी सीसीबी विभागाचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ भजंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून समीरला रंगेहात पकडले. तसेच त्याच्या जवळील 3,28,000 रुपये किमतीचे 16.40 ग्रॅम हेरॉईन, 5000 रुपये किमतीचा एक मोबाईल आणि रोख 220 रुपये असा मुद्देमाल जप्त केला.

 belgaum

पोलीस चौकशीत आरोपीने आपण सायन, कोळीवाडा (महाराष्ट्र) येथील सामंती नामक व्यक्तीकडून हेरॉईन आणल्याची माहिती दिली. याप्रकरणी मारीहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.