belgaum

बेळगावजवळ भीषण अपघात; दोन जण ठार, चालक गंभीर जखमी

0
2452
 belgaum

बेळगाव लाईव्ह : शहरातील येडियुरप्पा मार्गाजवळील राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी पहाटे भीषण अपघात घडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.

थांबलेल्या ट्रकला कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या गूड्स वाहनाने जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. अपघाताची तीव्रता इतकी होती की चालकाच्या शेजारी बसलेले दोघे जण जागीच ठार झाले, तर चालक गंभीर जखमी झाला आहे.

पहाटे झोपेच्या अंमलामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने उभ्या ट्रकला ही धडक बसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृतदेह व जखमी चालकाला तत्काळ बिम्स रुग्णालयात हलविण्यात आले.

 belgaum

कोल्हापूरहून शिवमोग्गा जिल्ह्यातील सोरबकडे जात असलेले कोंबड्यांनी भरलेले गूड्स वाहन अपघातग्रस्त झाले असून, या अपघातात वाहनातील शेकडो कोंबड्यांचा देखील मृत्यू झाला.

घटनास्थळी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पीएसआय अविनाश यांच्यासह पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली असून, याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.