belgaum

मराठा बँक नोकर भरती संदर्भात कृतिशील समाजाची अश्या मागण्या

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कृतिशील मराठा समाजाच्या वतीने मराठा सहकारी बँकेत सुरू असलेल्या भरती प्रक्रियेबाबत पारदर्शकता राखावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात बँकेचे मुख्य व्यवस्थापक ( जनरल मॅनेजर) धामणेकर यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, बँकेने जाहीर केलेल्या २२ रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेबाबत उमेदवार व संबंधित घटकांच्या वतीने काही महत्त्वाची माहिती मागविण्यात आली आहे.

सद्य भरती प्रक्रियेबाबत मागण्या :
सद्य लेखी परीक्षेचे आयोजन कोणत्या संस्था किंवा एजन्सीकडे सोपविण्यात आले आहे, याची माहिती द्यावी. तसेच लेखी परीक्षा व मुलाखतीसाठीचा संपूर्ण अभ्यासक्रम व गुणांकन पद्धती जाहीर करावी.
यासोबतच सद्य भरतीसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांची संपूर्ण यादी, आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांची एकूण संख्या, अर्ज छाननीचे वेळापत्रक आणि लेखी परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

 belgaum

मागील (२०२२-२३) भरती प्रक्रियेबाबत माहितीची मागणी :
ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेसाठी कोणत्या संस्थेकडून परीक्षा घेण्यात आली होती (रायचूर विद्यापीठाच्या समन्वयाने परीक्षा झाल्याचा उल्लेख आहे), याची पुष्टी करावी.


त्या कालावधीत लेखी परीक्षेला किती उमेदवार बसले होते आणि त्यापैकी किती उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले, याची आकडेवारी जाहीर करावी.

तसेच मूल्यांकन प्रक्रियेची पारदर्शकता लक्षात घेता, २०२२-२३ च्या भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या १५ उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची प्रत उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

कृतिशील मराठा समाजाने या सर्व माहितीद्वारे भरती प्रक्रियेत पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि जनविश्वास टिकून राहण्यासाठी ही माहिती अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.यावेळी कृतिशील मराठा समाजाचे अमित देसाई, दत्ता जाधव, शरद पाटील, आणि नारायण अष्टेकर यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.