belgaum

रविवार पेठ, कलमठ रोड रस्त्यांवर आता ‘एकेरी’ वाहतुक -पोलीस आयुक्त

0
386
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील रहदारी नागरिकांसाठी सोयीची सुलभ व्हावी यासाठी रविवार पेठ आणि कलमठ रोड या रस्त्यांवर एकेरी वाहतुकीचा नियम लागू करण्यात आला असून वाहन चालकाने याची नोंद घ्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

शहरातील रविवार पेठ आणि कलमठ रोड या रस्त्यांवर दुतर्फा असंख्य दुकाने आहेत. तसेच या रस्त्यांवर वाहनांचा मोठ्या प्रमाणात संचार असतो. त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडीचे प्रकार घडण्याबरोबरच या रस्त्यांचा वापर करणाऱ्या नागरिकांना वाहनांच्या रहदारीचा त्रास सहन करावा लागतो.

याची दखल घेऊन सदर रस्त्यांवर एकेरी वाहतूक करण्याच्या उद्देशाने पोलीस प्रशासनाने स्थानिक दुकानदार व रहिवाशांचे मत आजमावले असता 86 टक्क्यापेक्षा जास्त लोकांनी एकेरी वाहतुकीस मान्यता दिली. त्यामुळे आता रविवार पेठ व कलमठ रोड रस्त्यावर पुढील प्रमाणे एकेरी वाहतुकीची अंमलबजावणी केली जात आहे.

 belgaum

1) पिंपळकट्टा येथून कर्नाटक चौक मार्गे नरगुंदकर भावे चौकच्या दिशेने पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारा रविवार पेठ रस्ता. 2) नरगुंदकर भावे चौक येथून पिंपळकट्याकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारा कलमठ रोड रस्ता.

या पद्धतीने रविवार पेठ आणि कलमठ रोड या रस्त्यांचे ‘एकेरी’ वाहतुकीच्या रस्त्यांमध्ये परिवर्तन करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन वाहतूक नियमाचे काटेकोर पालन करण्याद्वारे बेळगाव शहर पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त बोरसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.