बेळगाव लाईव्ह : कोकण, गोवा तसेच उत्तर कर्नाटकातील विविध भागांतून खरेदी व व्यापारासाठी बेळगाव शहरात येणाऱ्या प्रवाशांसाठी मध्यवर्ती भागात आता राहण्यासाठी आणि भोजनासाठी एक नवा सुसज्ज पर्याय उपलब्ध झाला आहे.
हंस टॉकीज रोडवरील चित्रा थिएटर शेजारी ‘हॉटेल राजपथ बिकाॅन’ हे आधुनिक सुविधा असलेले हॉटेल नुकतेच सुरू झाले असून अल्पावधीतच त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
द फर्न हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेल्या या हॉटेलमध्ये एकूण 35 सुसज्ज खोल्या आणि सूट्स उपलब्ध आहेत.
बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही येथे बेसमेंट पार्किंगची प्रशस्त सुविधा देण्यात आली आहे. तसेच गरजेनुसार विमानतळ व रेल्वे स्थानकावरून ने-आण सेवा आणि स्थानिक प्रेक्षणीय स्थळांची माहिती व भेटींची सोयही उपलब्ध करून दिली जात आहे.

शाकाहारी भोजनालय, पारंपरिक स्वाद आणि पर्यावरणपूरक संकल्पनेवर भर
या हॉटेलमध्ये ‘पकवान’ नावाचे पूर्ण शाकाहारी रेस्टॉरंट कार्यरत असून येथे सकाळचा बफे नाश्ता, दुपार व सायंकाळी गुजराती आणि राजस्थानी थाळी तसेच पंजाबी, चायनीज आणि स्थानिक बेळगावचे लोकप्रिय पदार्थ उपलब्ध आहेत. मांडे, कुंदा, गोकाक कर्डंट आणि भडंग यांसारख्या खास पदार्थांमुळे बाहेरील प्रवाशांना स्थानिक चव अनुभवता येणार आहे.
हॉटेलचे कार्यकारी संचालक मिलिंदकुमार ठक्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्यावरणपूरक संकल्पनेवर आधारित या हॉटेलचे व्यवस्थापन द फर्न हॉटेल्सकडे आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात दर्जेदार निवास व भोजन सुविधा उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.





