belgaum

सरकारी शाळेच्या विद्यार्थिनीने मिळवले 625 पैकी 625 गुण

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह:

केवळ खाजगी शाळातून शिकून किंवा शहरात राहून परीक्षेत यश मिळते असं वळत नाही मेहनत आणि प्रयत्न असल्यास कुठेही यश मिळू शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने आपल्या जिद्दीच्या जोरावर अभूतपूर्व यश संपादन करत 625 पैकी 625 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे संपूर्ण जिल्ह्यात तिचे कौतुक होत आहे.

 belgaum

चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील कटकगेरी गावातील सरकारी शाळेत शिकणारी प्रार्थना नागप्प बिरादार पाटील हिने ही शानदार कामगिरी केली आहे. मर्यादित साधनसामग्री असतानाही तिने सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले.

प्रार्थनाच्या या यशामुळे कटकगेरी गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी तिच्या या यशाचे कौतुक करत तिच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रार्थना ही प्रेरणादायी ठरत असून, सरकारी शाळांमधूनही गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू शकते, हे तिने सिद्ध करून दाखवले आहे. 🏆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.