belgaum

किरकोळ वादात; पतीकडून पत्नीला पेटवण्याचा प्रयत्न

0
1029
 belgaum

बेळगाव लाईव्ह :खानापूर घरात साडीऐवजी गाऊन घालण्याच्या कारणावरून पतीनेच पत्नी मंजुळा हिला पेटवण्याचा अमानुष प्रकार खानापूर तालुक्यातील हत्तरवाड येथे घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हत्तरवाड गावातील कृष्णाजी पाटील आणि मंजुळा यांचा आठ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतरपासूनच कृष्णाजी हा पत्नीवर मानसिक व शारीरिक छळ करत असल्याचे सांगितले जात आहे.

१९ तारखेला नंदगड येथील त्यांच्या भाड्याच्या घरात गाऊन घालण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या कृष्णाजीने घरातील मॅचबॉक्समधील काडी पेटवून पत्नी मंजुळा हिला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

 belgaum

घटनेची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी नंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.