belgaum

गणेशोत्सवासाठी बेळगाव पोलिसांची विशेष वाहतूक व्यवस्था!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन बेळगाव शहर पोलिसांनी विशेष वाहतूक व्यवस्थापनाची तयारी केली आहे. गणेश मंडपांना भेट देणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, यासाठी विविध भागांमध्ये निर्धारित पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

गणेशोत्सव काळात शहरातील प्रमुख रस्त्यांवर नागरिकांची आणि वाहनांची मोठी गर्दी होते. त्यामुळे गणेश मंडपांजवळील पार्किंगची ठिकाणे नागरिकांना सहज शोधता यावीत, यासाठी पोलिस आयुक्तालयाने डिजिटल वाहतूक व्यवस्थापन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

यासाठी ganeshdarshan.belagavicitvpolice.in ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमध्ये GPS आधारित नेव्हिगेशनची सुविधा असून नागरिकांना गणेश मंडप तसेच त्याच्या जवळील निर्धारित पार्किंगचे ठिकाण सहज शोधता येणार आहे.

 belgaum

पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी सांगितले की, गणेशोत्सवाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असते. नागरिकांना गणेश मंडपांपर्यंत सहज पोहोचता यावे आणि वाहतूक कोंडी कमी व्हावी, यासाठी पार्किंगची ठिकाणे आणि गणेश मंडपांची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी या GPS आधारित सुविधेचा वापर करावा आणि पोलिसांनी निश्चित केलेल्या पार्किंग ठिकाणीच वाहने पार्क करून वाहतूक व्यवस्थापनासाठी सहकार्य करावे.

गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिसांकडून वाहतूक व्यवस्थापनासह सार्वजनिक सुव्यवस्थेवरही विशेष लक्ष दिले जात आहे.

नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने वाहने उभी करू नयेत आणि गणेशोत्सवाचा आनंद घेताना सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.