belgaum

शिंदोळीच्या निलेशचे NET–JRF यश

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह:सततचे कठोर परिश्रम, नियमित वाचन आणि दृढ निश्चय केला तर यश मिळू शकते, हे बेळगाव तालुक्यातील शिंदोळी गावच्या निलेश ज्योतिबा आगशिमनी यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. गणित विषयातील CSIR NET परीक्षा उत्तीर्ण करत त्यांनी कनिष्ठ संशोधन शिष्यवृत्ती (JRF) साठी पात्रता मिळवली असून त्यांच्या या यशामुळे शिंदोळी गावाचा शैक्षणिक मान उंचावला आहे.

निलेश यांनी यापूर्वी महाराष्ट्र SET तसेच कर्नाटक SET या दोन्ही राज्यस्तरीय पात्रता परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्या आहेत.
नियोजनबद्ध अभ्यास आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर त्यांनी यशाची ही मालिका कायम ठेवली आहे.
शालेय जीवनापासूनच ते बुद्धिमान व जिज्ञासू विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

सैनिक स्कूल विजयपूर प्रवेश परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली होती. तसेच राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स (NCC) अंतर्गत ‘सी’ प्रमाणपत्र परीक्षा उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण केली आहे.
प्राथमिक शिक्षण शिंदोळी येथील गोपाळ जिनगौडा प्राथमिक शाळेत पूर्ण केल्यानंतर त्यांनी बेळगाव येथील जी.ए. स्कूल व बी.के. मॉडेल हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतले. पुढे दीक्षा कॉलेजमधून पीयूसी पूर्ण करून आर.एल.एस. कॉलेजमधून बी.एस्सी. पदवी संपादन केली.

 belgaum

त्यानंतर कर्नाटक विद्यापीठातून गणित विषयात एम.एस्सी. पदवी प्राप्त केली.
आपल्या यशाचे श्रेय देताना निलेश म्हणाले, “कठोर परिश्रम, नियमित अभ्यास, प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन यामुळे हे यश शक्य झाले.”

विशेष म्हणजे, वयाच्या अठराव्या वर्षापासून ते दरवर्षी वाढदिवसानिमित्त रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत आहेत.
निलेश हे दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित गौंडवाड येथील महात्मा गांधी हायस्कूलमध्ये कार्यरत जे. पी. आगशिमनी यांचे ज्येष्ठ चिरंजीव असून एस. के. दिवटे यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या या देदीप्यमान यशामुळे शिंदोळी व बेळगाव परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.