belgaum

इंडिगोच्या पुढाकाराने पुन्हा सुरू बेळगाव – नवी मुंबई विमानसेवा

0
IndiGo
 belgaum

बेळगाव लाईव्ह :कांही महिन्यांपूर्वी बंद झालेली बेळगाव – नवी मुंबई विमान सेवा पुन्हा सुरू होणार असून इंडिगो एअरलाइन्सने येत्या दि. 29 मार्च 2026 पासून मुंबई -बेळगाव – नवी मुंबई अशी विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ही विमान सेवा सांताक्रुज ऐवजी नवी मुंबई विमानतळावरून नॉन स्टॉप सुरू केली जाणार आहे.

इंडिगो कंपनीने काल सोमवारपासून आपल्या वेबसाईटवरून मुंबई बेळगाव विमानसेवेचे बुकिंग देखील सुरू केले आहे. नवी मुंबई येथे बांधण्यात आलेल्या नव्या विमानतळावरून बेळगावला ही विमान सेवा उपलब्ध होणार आहे.

या विमान फेरीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे असेल. विमानाचे सकाळी 10:20 वाजता नवी मुंबई विमानतळावरून प्रस्थान आणि बेळगाव विमानतळावर सकाळी 11:35 वाजता आगमन.

 belgaum

त्याचप्रमाणे सायंकाळी 5:35 वाजता बेळगावहून प्रस्थान आणि सायंकाळी 6:45 वाजता नवी मुंबई विमानतळावर आगमन. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला पुन्हा विमान सेवा सुरू झाल्यामुळे शहरवासीयांमध्ये विशेष करून व्यापारी व उद्योजकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.