belgaum

कर्तव्यावर असताना कंग्राळी खुर्दचे जवान जगदीश शिंदे शहीद

0
994
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द गावचे सुपुत्र व भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान जगदीश शिंदे हे काल सोमवारी 2 फेब्रुवारी रोजी अंबाला हरियाणा येथे कर्तव्यावर असताना वाहन दुर्घटनेत शहीद झाले आहेत.

दिवंगत जवान जगदीश शिंदे यांचे पार्थिव उद्या बुधवार दि. 4 फेब्रुवारी 2026 रोजी बेळगाव येथे आणले जाणार असून त्यानंतर त्यांच्या मूळगावी कंग्राळी खुर्द येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

जगदीश शिंदे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्व स्तरातून शोक संवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

 belgaum

जगदीश हे कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय व देशी सेवेसाठी सदैव तत्पर जवान होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कंग्राळे खुर्द गावात शोककळा पसरली आहे.

जगदीश शिंदे यांना वीरगती मिळाल्याबद्दल विविध सामाजिक, राजकीय संघटनांसह नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली असून, त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.