belgaum

एपीएमसी आणि कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका जुगारावर धाड

0
177
Cop bgm
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध मटका जुगारावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एपीएमसी आणि कॅम्प पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण तीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम जप्त केली आहे.

पहिली कारवाई एपीएमसी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. बेळगावच्या कंग्राळी बी.के. येथील महादेव मंदिराजवळील सार्वजनिक ठिकाणी कल्याणी मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या धाडीत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मटक्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात कर्नाटक पोलीस कायद्याच्या कलम ७८(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 belgaum

दुसरी कारवाई कॅम्प पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. कॅम्प परिसरातील सर्कल जवळ सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार खेळत असताना पोलिसांनी एका आरोपीला रंगेहाथ पकडले. पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली असून आरोपीकडून रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.

या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून २ हजार ९७० रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. बेळगावच्या पोलीस आयुक्तांनी या यशस्वी कारवाईबद्दल संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.