belgaum

विवाहित युवक प्रेयसीची नदीत उडी घेऊन आत्महत्या

0
1142
Belgaum district map
 belgaum


बेळगाव लाईव्ह: दुसऱ्या विवाहाला कुटुंबीयांनी तीव्र विरोध दर्शवल्याने विवाहित युवकाने आपल्या प्रेयसीसह मलप्रभा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी रामदुर्ग पोलीस ठाणे हद्दीत घडली.


या घटनेत जगदीश यल्लाप्पा कवळेकर (वय २७, रा. मल्लापूर, ता. रामदुर्ग) आणि गंगम्मा पवाडेप्पा त्यापी (वय २६) यांचा मृत्यू झाला आहे.


जगदीश हा विवाहित असून त्याची पत्नी पहिल्या प्रसूतीसाठी माहेरी बोचबाळ येथे गेली होती. पत्नी परत आल्यानंतर दुसऱ्या विवाहाबाबत निर्णय घेऊ, असे कुटुंबीयांनी सांगितले होते. मात्र, त्यांनी दुसऱ्या लग्नाला स्पष्ट विरोध दर्शवल्याने घरात वाद झाला, अशी माहिती आहे.

 belgaum


या वादानंतर सोमवारी जगदीश व गंगम्मा दोघेही घरातून निघून गेले होते. त्यानंतर बुधवारी सकाळी मलप्रभा नदीत दोघांचे मृतदेह आढळून आले. घटनेची माहिती मिळताच रामदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह नदीतून बाहेर काढले.
या प्रकरणी रामदुर्ग पोलीस ठाण्याच्या पीएसआय सविता मुन्न्याळ यांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.