belgaum

सर्पमित्र रामा पाटील यांच्याकडून नागसापाला जीवनदान

0
581
 belgaum

बेळगाव लाईव्ह :जुना गुडशेड रोड, गोडसे कॉलनी, बेळगाव येथील एका घरासमोर आढळून आलेल्या तब्बल 6 फूटी अस्सल नाग सापाला शिताफिने पकडून सर्पमित्र रामा पाटील यांनी त्याला जीवदान दिल्याची घटना आज सकाळी घडली.

गोडसे कॉलनी, बेळगाव सामाजिक कार्यकर्ते तथा वन टच फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल फोंडू पाटील यांना आज बुधवारी सकाळी त्यांच्या घरासमोरील पायरीखाली एक साप दडून बसला असल्याचे निदर्शनास आले.

त्यांनी लागलीच सर्पमित्र रामा पाटील यांच्याशी संपर्क साधून सापाबद्दल माहिती दिली. तेव्हा तऱ्हेने घटनास्थळी दाखल झालेल्या रामा पाटील यांनी चार तासाच्या अथक परिश्रमानंतर फरशी खाली दडून बसलेल्या साधारण 6 फुट लांबीच्या अस्सल नागसापाला शिताफीने पकडले.

 belgaum

त्यानंतर सर्पमित्र पाटील यांनी त्या सापाबद्दल माहिती देऊन लोकांच्या मनातील भीती दूर केली. त्याचप्रमाणे पकडलेल्या सापाला जंगलात दूरवर नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येणार असल्याचे सांगितले.

अस्सल नाग सापाला पकडून परिसर सुरक्षित केल्याबद्दल विठ्ठल पाटील यांच्यासह उपस्थित सर्वांनी सर्पमित्र रामा पाटील यांचे अभिनंदन करून आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.